Coronavirus : लठ्ठ लोकांना ‘कोरोना’पासून जास्त सावध राहण्याची गरज आहे का ? जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –आत्तापर्यंत लोकांना प्रश्न पडला होता की कोरोना विषाणूमुळे वृद्ध लोक आजारी पडतील की तरुण. परंतु आता एक नवीन आणि अधिक धोकादायक प्रश्न जगासमोर आहे. तो म्हणजे कोरोना विषाणूमुळे लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या लोकांना जास्त नुकसान होते काय? युरोपच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, युरोपमध्ये कोरोना विषाणूग्रस्त सर्व लोकांपैकी दोन तृतीयांश लोक लठ्ठ आहेत. एनएचएसच्या मते, जर आपल्या शरीरावर जास्तीची चरबी असेल, आपला बॉडी मास इंडेक्स (BMI) जास्त असेल तर तुम्हाला कोरोना विषाणूचा धोका अधिक असतो.

याव्यतिरिक्त एनएचएसने असेही म्हटले आहे की गंभीर आजारी असलेल्यांपैकी ४० टक्के लोक ६० वर्षांपेक्षा कमी आहेत आणि लठ्ठ आहेत. केवळ युनायटेड किंगडममध्येच कोरोना संक्रमित रूग्णांपैकी ६३ टक्के रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ते सर्व लठ्ठ आणि उच्च बीएमआय वाले आहेत. गेल्या २४ तासात युकेमध्ये सुमारे १९४ लोक एकाचवेळी आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट झाले आहेत. यापैकी जवळजवळ १३० लोक त्यांच्या शरीरापेक्षा अधिक वजनाचे आहेत. कोविड -१९ कोरोना विषाणू अशा लठ्ठ लोकांसाठी अधिक प्राणघातक असल्याचे सिद्ध होत आहे.

एका वेळी आयसीयूमध्ये दाखल झालेल्या १९४ लोकांपैकी १३९ रूग्ण पुरुष आहेत. म्हणजे सुमारे ७१ टक्के पुरुषांचे प्रमाण आहे. तर महिलांची संख्या ५७ आहे, म्हणजेच ते प्रमाण २९ टक्के आहे. यापैकी १८ रुग्ण असे आहेत ज्यांना फुफ्फुस संबंधित किंवा हृदयरोग आहे. हे आजार लठ्ठपणामुळे उद्भवतात. याआधी देखील असे बरेच अभ्यास केले गेले होते ज्यात असे सांगितले गेले होते की लठ्ठ लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तसेच, त्यांना फुफ्फुसांशी संबंधित आजार होण्याची शक्यता देखील जास्त असते.

डॉक्टरांचा असा विश्वास आहे की लठ्ठ लोकांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतकी जास्त नसते जितकी कमी चरबी असणाऱ्या अथवा तंदुरुस्त असणाऱ्या लोकांची असते. लठ्ठ लोक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले अन्न खात नाहीत. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे शरीराच्या डायाफ्राम आणि फुफ्फुसांमध्ये समस्या निर्माण होतात. म्हणजे पूर्ण श्वास घेण्यास समस्या होते, म्हणजेच चरबीयुक्त लोकांना पूर्ण श्वास घेण्यास अडथळा येतो. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सीजन पोहोचत नाही. अशा परिस्थितीत लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते.

यूकेमध्ये सध्या ६६५० लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी ३३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात ३.५० लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. तर १६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.