दिलासादायक ! शास्त्रज्ञांनी माकडांमध्ये विकसित केली ‘कोरोना’विरुद्ध लढण्याची ‘क्षमता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे 170,740 लोकांना संसर्ग झाला. तर, 6687 लोकांचा मृत्यू झाला. त्यांनतर आता चीनमधून एक चांगली बातमी आली आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना व्हायरस संक्रमित केले होते. आता या माकडांच्या शरीराने या व्हायरसविरुद्ध इम्युनिटी (रोग प्रतिकारक शक्ती) प्राप्त झाली आहे.

माकडाद्वारे कोरोणा विषाणूंविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती विकसित करने म्हणजे मानव देखील आपल्यात ही इम्युनिटी बळकट करून या आजाराशी लढू शकतो. म्हणजेच आता या माकडांच्या शरीरावरुन अँटीबॉडी घेऊन नवीन लस तयार केल्या जाऊ शकतात.चिनी शास्त्रज्ञ एका महिन्यात या मानवावर वानरांकडून घेतलेल्या अँटीबॉडीजची चाचणी घेण्यास सुरुवात करतील. एवढेच नाही तर चीन कोरोना बरा झालेल्या लोकांसाठी लस बनवण्याचीही तयारी करत आहे.

अँटीबॉडी आपल्या शरीरात राहून बाहेरील बॅक्टेरिया आणि विषाणूच्या हल्ल्यापासून त्यांचे संरक्षण करतात. तसेच रोगांशी लढण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या संसर्ग होण्यापासून संरक्षण करतो.

दरम्यान, चीनमध्ये आतापर्यंत 75 हजाराहून अधिक लोकांना कोरोना विषाणूंपासून मुक्त केले गेले आहे. म्हणजेच ते बरे झाले आहेत. आता त्यांच्या शरीरातून अँटीबॉडीज घेऊन ही लस विकसित केली जाईल. तसेच, ते वानरांच्या अँटीबॉडीज सोबतही त्याचे मिश्रण करूनही त्यातील साम्य पाहिले जाईल.

तसेच लोकांना भीती आहे की जर त्यांना पुन्हा कोरोना व्हायरस झाला तर ? माहितीनूसार केवळ ०.१ ते १ टक्के लोकांनाच पुन्हा कोरोना विषाणूची लागण होत आहे. म्हणूनच, शास्त्रज्ञांना खूप आशा आहे की एकदा लस तयार झाल्यास एखाद्याला पून्हा कोरोनाचा संसर्ग झाल्यास ते सहज बरे होईल.