कोरोना काळात इम्यून सिस्टम ठेवायचीय मजबूत तर आजच सोडा ‘या’ 5 खाण्या-पिण्याच्या सवयी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना काळात इम्यून सिस्टम मजबूत असेल तर आपण आजारापासून वाचू शकतो. कोणते पदार्थ खावे, कोणते खाऊ नयेत याकडे लक्ष दिले पाहिजे. काही सवयी आपली इम्यून सिस्टम कमजोर करतात. यासाठी काही बदल करावे लागतील आणि काही सवयी सोडाव्या लागतील. या सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात…

1 चहा-कॉफीचे जास्त सेवन

अति चहा-कॉफी धोकादायक आहे. यामुळे इम्यून सिस्टम कमजोर होऊ शकते. संसर्गापासून वाचण्यासाठी ही सवय सोडून द्या.

2 हिरव्या पालेभाज्या सोडू नका

हिरव्या पालेभाज्या आवडत नसतील तर हे लक्षात घ्या की त्या तुमची इम्यूनिटी वाढवतात. यासाठी आहारात त्यांचा समावेश करा.

3 मीठाचे सेवन कमी करा

मीठ जास्त सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते. दिवसात कमाल पाच ग्रॅम मीठ सेवन करावे. जास्त मीठामुळे इम्यून सेल्स कमजोर होतात. संसर्गाचा धोका वाढतो.

4 जास्त साखर खाणे धोकादायक

गोड खाण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बदला. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात बॅक्टेरियांपासून बचाव करणार्‍या प्रतिकारशक्ती पेशी कमजोर होऊ लागतात.