संसर्गाची भीती वाढली ! सुरक्षित असलेल्या पृथ्वीवरील ‘या’ भागात ‘कोरोना’ने केला प्रवेश

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाविषाणूला जागतिक साथ म्हणून घोषित केलं आहे. कोरोनाग्रसत आता सुमारे आठ महिने होत आले आहेत. या आठ महिन्यांच्या काळात कोरोनाने संपूर्ण जगात आपले हात-पाय पसरवले आहेत. आश्चर्य म्हणजे एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही काही देश कोरोनापासून आतापर्यंत सुरक्षित होते. मात्र, आता या देशांमध्येही कोरोनाने प्रवेश केला आहे. पॅसिफिक महासागरातील देश असलेल्या वानुआटूमध्ये गेल्या बुधवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्याचबरोबर मार्शल आयलँडस आणि सोलोमन आयलँड येथे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

सामोआ आयलँडसमध्ये कोरोना पॉझिटिव्ह क्रू मेंबर्स असलेल्या जहाजाची सर्व्हिस केल्यानंतर स्थानिक कर्मचाऱ्याला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. टाईम डॉट कॉम च्या माहितीनुसार आता पृथ्वीवर केवळ ९ देश उरले आहे जिथे कोरोनाचे रुग्ण सापडले नाही. मात्र, यामध्ये उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही. या देशांमध्ये कोरोना विषाणू पोहोचला आहे, मात्र त्याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. पॅसिफिक महासागरातील विविध बेटांवर बसलेल्या देशांनी कोरोना विषाणूचा फैलावस सुरुवात झाल्यानंतर आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या होत्या.

मात्र आता हे देश कुठल्या ना कुठल्या प्रकारे कोरोनाविषयीच्या विळख्यात सापडले आहेत. वानुआटूच्या आरोग्य विभागाने सांगितलं, की अमेरिकेतून परतल्यानंतर एक वीस वर्षे तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडून आला आहे. सोलोमन आयलँडसवर पहिला रुग्ण ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला आला होता. यानंतर काही लोकांना ही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आलं होतं. दरम्यान, या छोट्या बेटावर फैलावून रुग्ण वाढले तर त्याला नियंत्रणात आणण्यात स्थानिक प्रशासनाला कठीण जाणार आहे, असा देशांमधील आरोग्यसेवा या खूप मर्यादित आहेत. दरम्यान, सध्या देशभरातील कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाच कोटी ३८ लाख पेक्षा अधिक झाले आहे तर १३ लाख ११ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सार्वत्रिक दोन लाख ४९ हजार मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.