IPS अधिकारी बनला ‘देवदूत’ ! मृत्यूच्या दारातील 78 रुग्णांसाठी उपलब्ध केले ऑक्सिजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ असल्याने प्राणवायूचा (Oxygen) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन प्राणवायू मिळवण्यासाठी मागणी करत आहे. यामध्ये दिल्लीमध्ये राठी रुग्णालयात प्राणवायूबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसले. तेथे फक्त १ तास पुरेल इतकाच प्राणवायू बाकी होता. या बिकट अवस्थेत एका IPS अधिकाऱ्याने रुग्णालयात प्राणवायू पुरवठा करण्याचे कर्तव्य हाती घेतले. त्यांचे नाव अरुण बोथरा असे आहे.

आयपीएस अरुण बोथरा यांच्या ट्विटनंतर अनेक लोक मदतीसाठी पुढे सरसावले, त्यांच्या ट्विटनंतर, या प्रकरणाची सर्वप्रथम दखल घेतली, ती वरिष्ठ IPS अधिकारी आणि गृह मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेल्या संजीव गुप्ता यांनी. यावरून संजीव गुप्ता यांनी गृह मंत्रालयाच्या कंट्रोल रूमला अलर्ट केले. याबाबत मुंडका आणि रनहोलाच्या SHO सोबत सवांद साधला. यानंतर या २ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर रुग्णालयासाठी २४ Type-D प्राणवायू टाकी आणि १४ टनांच्या एका प्राणवायू ट्रकची व्यवस्था उपलब्ध झालीय. तर,ऑक्सिजनची व्यवस्था झाल्यानंतर राठी रुग्णालय प्रशासनाने IPS अरुण बोथरा यांचे आभार मानत, मागील ६ तासांपासून अडकलेले आमचे प्राणवायू सिलेंडर रिलीझ करण्यासाठी मदद केल्याबद्दल आभार अरुण सर, असे ट्विट करण्यात आले आहे.

या दरम्यान, IPS अरुण बोथरा यांनी या प्राणवायू पुरवठा व्हायच्या आधी अनेक प्रयत्न केले, सर्व प्रथम रुग्णालय प्रशासनाने अरविंद केजरीवाल, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि पंतप्रधान यांना मेंशन करत एक ट्विट केले, की आमच्या रुग्णालयाला ऑक्सीजन सप्लाय होत नाहीय. यामुळे दाखल ७८ रुग्णांच्या उपचारात अडथळा येत आहे. आम्ही सकाळपासूनच कॉल करत आहोत, पण, कुठल्याही हेल्पलाइन नंबरवर आमच्या कॉलला उत्तर मिळत नाही. आम्ही फोन करत आहोत, मात्र ते फोन कट करत आहेत. कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा असे रुग्णालय प्रशासनालयाने म्हटले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या ट्विटनंतर, ओडिशात तैनात असलेले वरिष्ठ IPS अधिकारी अरुण बोथरा मदतीसाठी सरसावले. रुग्णालयाच्या ट्विटला कोट करत त्यांनी लिहिले, ‘पुन्हा एकदा राठी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रात्री २ वाजेपर्यंत त्यांच्याकडे फक्त १ तासांचाच प्राणवायू शिल्लक आहे. ६८ रुग्णांचा जीव धोक्यात आहे. यावेळी कुणी सहकार्य करू शकते का? कृपया हे पुढे पाठवा आणि आपण जशी शक्य आहे तशी मदत करण्यास पुढे या.

अरुण बोथरा हे १९९६ बॅचचे ओडिशा कॅडरचे IPS अधिकारी आहेत. ते नेहमीच गरजूंना मदत करत असतात. मागील वर्षीच्या लॉकडाउनमध्येही त्यांनी स्वतः प्रयत्न करून एका तरुणाचा जीव वाचवला होता. तेव्हा, एका महिलेने पंतप्रधान मोदींना टॅग करत मुलासाठी सांडणीच्या दूधाची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी राजस्थानात सांडणीच्या २० लिटर दुधाची व्यवस्था केली होती. यानंतर हे दूध रेल्वेच्या सहाय्याने मुंबईला संबंधित मुलाच्या आईपर्यंत पोहोचविण्यात आले. तसेच, एका १२ वर्षांच्या मुलाचीही त्याच्या आई-वडिलांशी भेट घालून दिली होती. हा मुलगा दिल्लीतील द्वारका भाकातील एका पार्कमध्ये आढळून आला होता.