Coronavirus : ‘या’ देशात ‘कोरोना’चं औषध समजून लोकांनी ‘प्राशन’ केलं ‘विष’, 600 जणांचा मृत्यू, 3000 आजारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या 3800 वर पोहोचली आहे. परंतु विषारी मद्यपान केल्यामुळे येथे 600 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर विषारी मद्यपान करून आजारी पडणाऱ्या 3000 लोकांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. एका वृत्तानुसार, मंगळवारी इराणचे प्रवक्ते घोलम हुसेन इस्माइली म्हणाले की लोक कोरोनाचे औषध म्हणून नीट अल्कोहोल पित होते. यानंतर मोठ्या संख्येने लोक आजारी पडले.

इस्माइली म्हणाले की, विषारी मद्यपान केल्यामुळे मृत्यूची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ते म्हणाले की अल्कोहोल पिण्यामुळे आजार बरे होणार नाहीत परंतु ते प्राणघातक ठरू शकते. एका न्यूज एजन्सीशी बोलताना ते म्हणाले की या प्रकरणात बर्‍याच लोकांना अटकही करण्यात आली आहे. अटक झालेल्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

इराणमध्ये 62 हजाराहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. परंतु इराणने कोरोना विषाणूबद्दल जाहीर केलेल्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारवर आरोप आहे की ते मृतांची संख्या कमी करून दर्शवित आहेत. इराणच्या संसदेच्या किमान 31 सदस्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणू प्रकरण बाहेर आल्यानंतर संसद बंद करण्यात आली होती, परंतु मंगळवारी संसद पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी दुपारपर्यंत जगभरात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 1,431,900 च्या वर गेली आहे. त्याच वेळी, जगभरात 82000 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like