‘या’ प्रकारची लक्षणं बदलून आणखी रहस्यमयी होतोय Coronavirus, तुमच्यासाठी या धोकादायक व्हेरियंटला जाणून घेणं गरजेचं

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  एकीकडे वर्षभरानंतर पुन्हा कोरोना भयंकर प्रकोप दाखवत आहे. दुसरीकडे तो दिवसेंदिवस रहस्यमय होत चालला आहे. व्हॅक्सीन आल्यानंतर सुद्धा कोरोना व्हायरस कमजोर होताना दिसत नाही. उलट नवीन रूपासह हाहाकार माजवत आहे. आता नव्या रिसर्चमध्ये खुलासा झाला आहे की कोरोनाच्या बदलणार्‍या लक्षणांनी मेडिकल सायन्स सुद्धा हैराण आहे. कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा लोक कोरोना संक्रमित आढळत आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भीषण कहर सुरू असताना मोठी चिंता ही आहे की, व्हायरसचा नवा स्ट्रेन जुन्यापेक्षा जास्त घातक आहे. हा स्ट्रेन तरूण आणि मुलांना सुद्धा बाधित करत आहे, परंतु आता डब्ल्यूएचओनुसार वेगवेगळ्या कोरोना संक्रमितांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहेत आणि भारतात नव्या प्रकरणांबाबत जो स्टडी झाला आहे, त्यानुसार सुद्धा बदलत्या स्ट्रेनमुळे लक्षणे बदलत आहेत.

बदलत आहेत कोरोना लक्षणे
आतापर्यंत सर्व लोकांना हे माहित होते की, कोरोनाची लक्षणे – ताप, थकवा, सर्दी-खोकला, चव आणि वास न येणे. परंतु आता जी लक्षणे समोर आली आहेत, ती आहेत – पोटदुखी, उलटी, अतिसार, भूक कमी होणे, कमजोरी आणि सांधेदुखी. नव्या रिपोर्टनुसार ब्राझील आणि केंटचे कोरोना व्हेरिएंट्स जास्त शक्तीशाली आहेत आणि याच्यामुळे नव्या प्रकारची लक्षणे समोर येत आहेत.

यापूर्वी यूके आणि दुसर्‍या युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेच्या दरम्यान ताप किंवा खोकल्याशिवाय सुद्धा अन्य लक्षणे समोर आली होती. परंतु आता भारतात सुद्धा ताप आणि खोकल्यासारखी सामान्य लक्षणे दिसत नसतील तरी सुद्धा डॉक्टर टेस्ट करण्याचा सल्ला देत आहेत आणि रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार गुजरातच्या डॉक्टरांना सुद्धा रूग्णांमध्ये कोरोनाची बदललेली लक्षणे दिसत आहेत.

भारत सरकारनुसार सध्या देशातील 18 राज्यात कोरोनाचे धोकादायक व्हेरिएंट मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सापडलेल्या डबल म्यूटेंट स्ट्रेनचा सुद्धा समावेश आहे. महाराष्ट्रात ज्या केस समोर आल्या आहेत त्यामध्ये व्हायरसमध्ये दोन ठिकाणी बदल झाले आहेत. यामुळे याची ट्रान्समिशन क्षमता वाढली आहे म्हणजे वेगाने पसरत आहे, ज्यामुळे राज्यात आरोग्य सेवा गडबडली आहे. पुण्यात एकही व्हेंटिलेटर रिकामा नाही आणि आता केवळ 376 ऑक्सीजन बेडच शिल्लक आहेत, तर प्रतिदिन येथे 5-6 हजार पेक्षा जास्त नवीन केस सापडत आहेत. पुण्यात स्थिती इतकी खराब आहे की लष्कराची मदत मागण्यात आली आहे.