Coronavirus : 4 दिवसांत 1 लाख लोकांना ‘कोरोना’ची लागण

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा विळखा घटट होत चालला असून दिवसेंदिवस विषाणूंची वाढ झपाट्याने होत आहे. जगभरात 3 लाख लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली असून विषाणू थांबवण्यासाठी सर्व देशांनी आवश्यकत्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आवाहान केले आहे. कार्यकारी संचालक मायकल रेयन यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाचा कसा पसरला याची आकडेवारी जाहीर केली.

पहिल्या कोरोना रुग्णानंतर 64 दिवसांनी 1 लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र केवळ 11 दिवसात दुसर्‍या टप्प्यात कोरोना पसरला. आता कोरोना इतका झपाट्याने वाढत आहे की, केवळ 4 दिवसांत 1 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही परिस्थिती धक्कादायक असून, यातून बाहेर पडण्यसाठी लवकरात लवकरत उपाय योजना करणे आवश्यक आहे. भारताबाबत बोलायचे झाल्यास, देशातील 30 राज्य सध्या लॉक डाऊन करण्यात आली आहेत. तर, महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. भारत सध्या दुसर्‍या टप्प्यात असला तरी, भारतात वेगाने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपायांचे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी कौतुक केले. रेयान यांनी, भारत हा चीनसारख्या जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीनचे काय झाले आपण सर्वांनी पाहिले. मात्र सार्वजनिक आरोग्य पातळीवर भारताने घेतलेली आक्रमक भुमिका योग्य आहे, असे सांगितले.