‘जनता कर्फ्यू’मुळे घरीच थांबले देवेंद्र फडणवीस, कुटुंबासमवेतचा व्हिडिओ केला शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या विळख्यात संपूर्ण जग आले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले असून देशात देखील धूमाकूळ घातला आहे. सध्या देशात कोरोना दुसऱ्या स्टेजवर आहे. मात्र हा आजार तिसऱ्या स्टेजवर जाण्यापासून रोखायचं असेल तर आपल्याला सरकारने घेतलेल्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गर्दी टाळणे, गर्दीत जाणे टाळणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना आज (रविवार) देशात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या आवाहनाला देशभरात प्रतिसाद मिळत आहे. याला प्रतिसाद देत भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासमवेतचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मीही माझ्या कुटुंबासोबत घरी आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ द्यायचा नाही, यामुळे आपण रस्त्यावर फिरणं टाळायचं आहे. आज जरी रात्री 9 वाजता जनता कर्फ्यू संपणार असला तरीही कोरोनाला रोखण्यासाठी आपल्याला यापुढे काही दिवस घरीच थांबावे लागेल. 31 मार्चपर्य़ंत किंवा त्यापुढे सरकार जोपर्यंत सांगत आहे तोपर्यंत आपल्याला हे करावं लागणार आहे. कोरोनाला हरवायचं असेल आणि भारताला जिकवायचं असेल तर आपल्याला घरी थांबावच लागेल, असे देवेंद्र फडवीस यांनी म्हटलं आहे.