‘कोरोना’ कमांडोंच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवताना स्टार डान्सर सपना चौधरीला अश्रू अनावर ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 22 मार्च 2020 हा दिवस अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी लक्षात ठेवला जाणार आहे. या दिवशी साऱ्यांनीच जनता कर्फ्युचं पालन केलं. सायंकाळी सर्वांनी कोरोना कमांडोंना सलाम केला. सामान्य माणसांसोबत साऱ्यांनीच त्यांना सलाम करत थाळी आणि टाळ्या वाजवल्या होत्या. अशात हरियाणवी डान्सर आणि बॉलिवूड स्टार सपना चौधरी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आपल्या ठुमक्यांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या सपनाचं यावेळी दुसरं रूप पहायला मिळालं. व्हिडीओत दिसत आहे की, सपना आपल्या घराच्या बाल्कनीत आली आणि टाळ्या वाजवत आहे. सर्व देशासाठी हे 5 मिनिट खास होते. सपना चौधरी यावेळी खूपच इमोशनल झाली. कोरोना कमांडोंच्या कामानं ती खुश होती. तिच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू या गोष्टीची ग्वाही देत होते.

सपनानं तिच्या इंस्टावरून तिचा हा आनंदाश्रूवाला व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. सपना व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, “वाईट काळातही काही चांगलं असतं. आपल्या ऐक्यावर आणि अखंडतेवर मला गर्व आहे.” असं ती म्हणाली आहे. सर्वांची एकता पाहून तिला रडू कोसळलं. सपनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.