Coronavirus : जपानमध्ये 4 दिवसांचा आठवडा करण्याची कंपन्यांची सूचना

टोकियो : वृत्तसंस्था – कोविड-19 विषाणूच्या माऱ्यापुढे जगभरातील महासत्तांपासून विकसनशील देश हतबल झाले आहेत. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन तर जाहीर केले. त्यावर लस शोधण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. पण लॉकडाउनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. त्यातून बोध घेऊन हळूहळू कोरोनासोबत जगण्याची सवय जग करून घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक देशांत लॉकडाउन उठवला जात आहे.

https://twitter.com/ians_india/status/1261163475834998784/photo/1

औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या जपानसारख्या देशातही लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. त्याचा सामना तेथील सरकार करत आहे. आता तेथील उद्योग हळूहळू सुरू होत आहेत. पण कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने सोश डिस्टन्सिंग पाळणं तर आवश्यक आहेच म्हणून जपानमधील प्रतिष्ठित कंपन्यांनी आठवड्यातील 4 दिवस लोकांना कामावर बोलवण्याची सूचना केली आहे. चार दिवस काम केल्यामुळे व्यवसाय सुरू पण राहतील आणि सोशल डिस्टिन्सिंगही पाळलं जाईल, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे.