Jio पासून BSNL पर्यंत मोबाईल कंपन्यांनी वाढवली ‘वैधता’, ‘फ्री टॉकटाईम’ देखील

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संकटाच्या दरम्यान ट्रायने सगळ्या दूरसंचार कंपन्यांना आवाहन केले होते कि प्रीपेड ग्राहकांची वैधता वाढवावी. यानंतर सगळ्या दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांची वैधता लॉकडाऊन पर्यंत वाढवली असून यात सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल, एमटीएनएल शिवाय, एअरटेल आणि वोडाफोनही आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सोमवारी सगळ्या कंपन्यांना लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांच्या रिचार्ज आणि कुपन मिळताना येणारी अडचण पाहता वैधता वाढवण्याचे आवाहन केले होते. नंतर ताबडतोब सरकारी दूरसंचार बीएसएनएल आणि एसटीएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांची टॉकटाइम वैधता २० एप्रिल पर्यंत वाढवली होती.

सोबतच १० रुपयाचा मोफत टॉकटाइम देखील दिला गेला. याशिवाय एअरटेलनेही वैधता १७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे आणि १० रुपयाचा मोफत टॉकटाइम दिला आहे. याचा फायदा एअरटेलच्या ८ कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार आहे.

तर दुसरीकडे जिओ देखील मोफत सुविधा देत असून त्यांनी आपल्या ग्राहकांची वैधता १७ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. तसेच त्यांना १०० मिनिट कॉल करण्यासाठी मोफत दिली आहेत. सोबत १०० एसएमएस दिले असून कंपनीने म्हटले की, १७ एप्रिल पर्यंत ग्राहकांना युपीआय, एटीएम, एसएमएस आणि कॉलद्वारे रिचार्ज करण्याची सुविधा दिली आहे.

एजीआर आणि मोठ्या तोट्यातून जाणारी कंपनी वोडा-आयडियाने देखील संकटाच्या काळात आपल्या १० कोटी ग्राहकांची प्रीपेड वैधता १७ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. वोडा आयडिया लिमिटेडने मंगळवारी केलेल्या विधानात म्हटले की, कमी उत्पन्न असलेले ग्राहक विना रिचार्ज इनकमिंग कॉलची सुविधा घेऊ शकतात. याशिवाय त्यांना १० रुपयाचा अतिरिक्त टॉकटाइम देखील दिला जात आहे.

You might also like