फायद्याची गोष्ट ! Jio Fiber ची शादार ‘ऑफर’, फक्त 199 रूपयांमध्ये मिळणार 1024GB डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन दरम्यान घरातून काम करणाऱ्या लोकांचा विचार करून टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सला कंपनीच्या JioFiber अ‍ॅड-ऑन प्लॅननुसार 199 रुपयात 1024 GB म्हणजेच 1 TB डेटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओची 199 रुपयांची योजना
जिओची 199 रुपयाची योजना कॉम्बो पॅक आहे. या योजनेत, युजर्सला एक टीबी म्हणजेच 100 एमबीपीएसच्या स्पीडने 1024 GB डेटा मिळणार आहे. जर डेटा लिमीट वेळेच्या आधिच संपला तर इंटरनेटचा स्पिड एक एमबीपीएस पर्यंत कमी होईल. या शिवाय या योजनेत लँडलाईन सेवा असणारी अमर्याद कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. या दुहेही डेटाचा फायदा युजर्सला 7 दिवसांसाठी मिळणार आहे.

जिओची 699 रुपयांची ब्रॉडबँड योजना
या योजनेत युजर्सला 100 एमबीपीसच्या स्पिडने डेटा मिळेल. तसेच युजर कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद कॉलिंग करू शकतो. या शिवाय युजर प्रिमियम अ‍ॅप्सची फ्री सबस्क्रिपशन मिळणार आहे.

जिओने ब्रॉडबँड सेवा वाढविली
मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स जिओने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपल्या फायबर सेवेचा विस्तार करत आहे. कंपनीने दिल्ली-एनसीआर सर्कलमध्ये आपली ब्रॉडबँड सेवा वाढविली आहे. जणेकरून डेटाची मागणी पूर्ण केली जाऊ शकते.