उल्हासनगर महापालिकेत 353 जागांसाठी जम्बो भरती

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टरांसह अन्य अशा ३५३ जागांसाठी पदानुसार पात्र उमेवारासाठी भरतीचे आयोजन केले आहे. डॉक्टरांसह अन्य पदाची तात्पुरत्या स्वरूपात जम्बो भरती सुरू केली आहे. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, महापालिकेला आरोग्य सुविधेबाबत राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून होते. कोरोनाच्या संकटात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी महापालिकेने खाजगी साई प्लॅटिनम रुग्णालय प्रति महिना २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. तसेच आरोग्य सेवेवर ताण पडू नये, म्हणून मनपा आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडी, मदन सोंडे, वैधकीय अधिकारी दीपक पगारे, डॉ. राजा रिजवानी, डॉ. अनिता सपकाळे आदींनी डॉक्टरसह अन्य पदे तात्पुरत्या स्वरूपात भरतीचा करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या भरतीत डॉक्टरांचा प्रतिसाद महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदाची भरती सुरू केली असून आजच्या डॉक्टर भरतीला डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला. तर परिचारिकासह अन्य पदाची भरती सोमवार ते शुक्रवार दरम्यान होणार आहे. महापालिकेने कोणत्या पदासाठी किती जागा दिल्या आहेत ते जाणून घ्या.

एकूण पदे : ३५३

पदाचे नाव आणि जागा :

फिजिशियन डॉक्टर – १०

भुलतज्ञ डॉक्टर – १०

वैधकीय अधिकारी – २५

परिचारिका – २६६

प्रयोगशाळा तज्ञ – ६

औषध निर्माता – ६

वॉर्डबॉय – ३१