Coronavirus : कमल हासन यांचा ‘कोरोना’ग्रस्तांसाठी मदतीचा हात ! घराला रुग्णालयात बदलण्याची ‘इच्छा’


पोलीसनामा ऑनलाईन :
अभिनेता ते नेता बनलेले कमल हानस यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या घराचे रुपांतर रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कमम हासन यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये कमल हासन म्हणतात, डॉक्टर्स आणि माझी पार्टी मक्कल निधी मयम(MNM) यांच्या मदतीनं बिल्डींगला तात्पुरत्या स्वरूपात मला रुग्णालयात रुपांतरीत करायचं आहे.”

कमल हासन यांनी पुढे म्हटलं आहे की, “जर सरकार यासाठी परवानगी देत असेल तर मी यासाठी तयार आहे. कोरोनाच्या या महामारीच्या संकटात मला आपल्या देशाची, राज्याची आणि आपल्या देशवासियांची मदत करायची आहे.” सध्या कमल हासन यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काम हासन यांनी दाखवलेली मदतीची भावना पाहून नेटकऱ्यांसह साऱ्याच चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. सध्या त्यांच्या ट्विटची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे. अनेकांनी कमल हासन यांच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमल हासन यांच्या या ट्विटवर कमेंट करत आपल्या भावना मांडल्या आहेत.

You might also like