Coronavirus : कनिका कपूरचा 6 वा कॉविड-19 टेस्ट रिपोर्ट ‘निगेटीव्ह’, 17 दिवसांनंतर मिळाला ‘डिस्चार्ज’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड सिंगर कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाली होती ज्यानंतर तिच्यावर लखनऊच्या पीजीओ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता कनिका कपूर पूर्णपणे ठिक झाली असून तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या 17 दिवसांपासून ती रुग्णालयात भरती होती.

कनिकवर उपचार सुरू असताना तिची अनेकवेळा कॉविड 19 टेस्ट झाली होती ज्यात सलग 5 वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटीव आला होता. परंतु सहावी टेस्ट झाल्यानंतर तिचे रिपोर्ट निगेटीव आले ज्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कनिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती तिला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते.

कोरोनाची लागण झालेल्या कनिका कपूरच्या याआधी पाच कोरोना व्हायरस टेस्ट करण्यात आल्या होत्या. ज्यात ती पॉझिटीव आढळली होती. तरीही तिच्याबद्दल एक दिलासा देणारा बाब समोर आली होती. पीजीओ हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. कनिकामध्ये या आजाराची कोणतीही लक्षणं नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. सतत टेस्ट पॉझिटीव आल्यानं तिच्या घरच्यांचीही चिंता वाढली होती. यानंतर कनिकाचे रिपोर्टही निगेटीव्ह आले आणि आता तिला डिस्चार्जही मिळाला आहे.