Coronavirus : अडीच वर्षांचा मुलगा ‘यश’ला करण जोहरनं विचारला ‘कोरोना’वर प्रश्न, मुलानं दिलं ‘असं’ उत्तर (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरसमुळं सध्या देशभरात लॉकडाऊन लागू झाला आहे. सामान्य माणसांसोबतच आता बॉलिवूड कलाकारही घरातच आपला टाईम स्पेंड करत आहेत. डायरेक्टर करण जोहर यानं त्याची मुलं यश आणि रूही यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर पुन्हा एक यशचा व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल झाला आहे.

करणनं त्याच्या इंस्टावरून यशचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, करण मुलगा यशला विचारतो की, “मी तुला आता कोरोना व्हायरसबद्दल सांगितलं आहे. तू यावर काय म्हणशील ?” यावर यश म्हणतो, “तो खूप वाईट आहे.” व्हिडीओ शेअर करताना करण म्हणतो, कोरोनासोबत लढण्याची प्रत्येकाची आपली पद्धत आहे. करणचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच करणचा आगामी सिनेमा तख्त येणार आहे. कोरोन व्हायरसमुळं सिनेमाच्या शुटींगला ब्रेक लागला आहे. करण तख्त सिनेमातून तब्बल 4 वर्षांनी डायरेक्शनमध्ये वापसी करत आहे.

पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, आलिया भट, जान्हवी कपूर, विकी कौशल, करीना कपूर आणि अनिल कपूर लिड रोलमध्ये आहेत.