Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 25 जणांचा बळी, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांचे आकडे वाढत आहेत. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं 25 जणांचा बळी गेला आहे तर नव्या 486 रूग्णांची भर पडली आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात तब्बल 522 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 17228 वर गेली आहे.

सध्या पुणे शहरात एकुण 6134 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत तर आतापर्यंत तब्बल 10451 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 6134 रूग्णांपैकी 350 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यापैकी 59 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर असून त्यांना उपचार देण्यात येत आहेत. आतापर्यंत 643 जणांचे कोरोनामुळं बळी गेले आहेत.