Coronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘किंग’ खाननं दिली सर्वाधिक रक्कम ? ट्विटरवरून ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशात कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकजण आपापलं योगदान देताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खान अलीकडेच डोनेशन न देण्यासाठी ट्रोल झाला होता. अशात आता त्यानं डोनेशन दिल्याचं समजत आहे. त्याच्या या डोनेशनची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे. शाहरुखनं याबाबत भाष्य केलेलं नाही परंतु त्याच्या चाहत्यानं याबाबत खुलासा केला आहे.

शाहरुखनं अलीकडेच 7 वेगळ्या कॉजसाठी डोनेशन दिल्याचं सांगितलं जात आहे. रेड चिलीज च्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती समोर आली आहे. अद्याप डोनेशन किती दिलं आहे हे मात्र समोर आलेलं नाही. चाहत्यांनी मात्र याबाबत खुलासा केला आहे. मात्र या आकड्यात किती तथ्य आहे याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

एका युजरनं सांगितलं की, “शाहरुखनं 70 कोटीहून अधिक अमाऊंट डोनेट केली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील इतर स्टार्सनं दिल्या गेलेल्या डोनेशनपेक्षा ही रक्कम सर्वात जास्त आहे असा दावाही केला गेला आहे.

https://twitter.com/srkrdelhi1/status/1246276517253931009

ही माहिती समोर आल्यानंतर मात्र चाहते इम्प्रेस झाल्याचं दिसत आहे. शाहरुखच्या नावानं काही हॅशटॅगही सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहेत.