कोणतं मास्क ‘कोरोना’ व्हायरसपासून ‘बचावा’साठी सर्वात चांगलं, स्टडीमध्ये समजलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणू आणि मास्क संदर्भात झालेल्या 172 अभ्यासांच्या विश्लेषणाने काही विशेष माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिले आहे. विश्लेषणात असे आढळले आहे की कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी एन 95 आणि रेसिपरेटर मास्क, कपड्यांनी बनलेले मास्क आणि सर्जिकल मास्कपेक्षा चांगले असतात. विश्लेषणाचा रिझल्ट एका मासिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नवीन विश्लेषणानंतर डब्ल्यूएचओने अशी शिफारस केली पाहिजे की आवश्यक सेवांशी संबंधित असलेले लोक किंवा डॉक्टर आणि परिचारिकांनी सर्जिकल मास्कऐवजी एन 95 मास्क परिधान करावा.

एका वृत्तानुसार, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर डेव्हिड माइकल्स यांनी म्हटले आहे की हे खूप निराशाजनक आहे की डब्ल्यूएचओ आणि सीडीसी (अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) ने सल्ला दिला आहे की सर्जिकल मास्क पुरेसे आहेत, परंतु परिस्थिती तशी नाही. एका अहवालानुसार एन 95 मास्कच्या कमतरतेमुळे बर्‍याच देशांनी लोकांना साधे मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. डेव्हिड माइकल्स म्हणाले की सर्जिकल मास्कवर अवलंबून राहून बरेच कामगार संक्रमित झाले आहेत यात काही शंका नाही. विश्लेषणामध्ये असेही दिसून आले आहे की एन 95 मास्कच्या वापरामुळे कोरोनापासून 96 टक्के संरक्षण होते. तसेच या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की सर्जिकल मास्क कोरोनापासून केवळ 77 टक्के संरक्षण करतात.

प्रोफेसर डेव्हिड माइकल्स म्हणाले की केवळ आरोग्य सेवा कामगारच नव्हे तर जोखमीच्या क्षेत्रात काम करणारे लोक, जसे की मीट पॅकेजिंगमध्ये काम करणारे कामगार, शेतात काम करणारे कामगार यांना देखील एन 95 मास्कपासून संरक्षण मिळू शकते. डब्ल्यूएचओने अद्याप सर्व देशांतील लोकांना मास्क परिधान करण्याची शिफारस केलेली नाही. परंतु अनेक देशांमध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याच वेळी, अनेक तज्ञांनी देखील मास्क संदर्भात डब्ल्यूएचओच्या धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बरेच तज्ञांचे मत आहे की मास्क हे कोरोना रोखण्यासाठी एक सोपे आणि स्वस्त साधन आहे. विशेषत: जेव्हा हे कळाले की विषाणूची लक्षणे नसलेल्या लोकांपासून देखील कोरोना पसरतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like