Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटात या भागातील ‘हे’ सर्वात मोठं कुटुंब राहतंय कसं एकत्रित, जाणून घ्या

मिझोराम, पोलिसनामा ऑनलाईन – जगातील सर्वात मोठे कुटुंब असे ख्याती असलेले १८१ सदस्याचे कुटूंब कोरोनाकाळात कसे एकत्र राहत आहे , जाणून घेऊयात. या १८१ सदस्य असणाऱ्या कुटुंबात जिओना चाणा हे आपल्या ३९ पत्नींबरोबर तसेच ९४ अपत्य आणि १४ सुना तसेच ३३ नातवंड आणि एक पणतू बरोबर राहतात. हे सर्व १८१ सदस्य १०० खोल्या असणाऱ्या घरात मिझोराम येथील बटवंग या गावी राहतात. शिवाय हे सर्व जण गुण्या गोविंदाने आनंदाने एकत्र राहतात. सध्या मिझोराम मध्ये कोरोनाचा १ रुग्ण आढळला आहे. मिझोराम सरकारने सांगितले कि या एकत्र कुटुंबावर त्यांचे देखील लक्ष असून जिओन चाना हे आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेत आहेत तसेच घरातील प्रत्येक सदस्य हा स्वतःची काळजी घेत आहे. तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वजण त्या संबंधी उपाययोजना देखील करीत आहे. त्यामुळे अजूनतरी या घरातील कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही .

कुठल्याही सामान्य घराला लागणारे महिन्याभराच्या सामान या कुटुंबातील सदस्यांना १ दिवसासाठी लागते. एक दिवसासाठी ४५ तांदूळ तसेच , दिवसाला ३० ते ४० कोंबड्या , २५ किलो डाळ , तसेच तब्बल ६० किलो भाज्यांची असते.

या कुटुंबाची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली आहे. एकत्र इतका मतदार वर्ग असल्याने राजकीय दृष्ट्या देखील या कुटुंबाला खूप महत्व आहे. जिओना चाना यांना सर्वात मोठं कुटुंब असल्याचा खूप अभिमान आहे

आता जाणून घेऊया इतकं मोठं कुटुंब राहत तरी कस एकत्र-

जिओन चाना यांनी घरातील सदस्यांसाठी काही नियमावली बनवली आहे. त्यांनी प्रत्येकाला कामे विभागून दिली आहेत. हे सर्व जण आपापली कामे नित्यनियमाने करतात. त्यामुळे प्रामुख्याने भांडणे होत नहित आणि. घरातील शिस्त पाळली जाते. त्याच बरोबर घरातील महिला या शेती करतात. तसेच घर सांभाळतात जिओना यांची मोठी पत्नी घरातील महिलांना कामे वाटून देते.