सावधान ! WHO नं ‘कोरोना’बद्दल दिला नवीन ‘इशारा’, धोका आणखी वाढण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजपर्यंत २०,२५,९६६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ७३८,९५६ जणांचा मृत्यू झाला आहे. ५२ लाखांपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या अमेरिकेत आता एक लाख ६६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) लक्ष ठेवत असून, WHO ने कोरोनाबद्दल नवा इशारा दिला आहे.

WHO कोरोना प्रमुख डॉ. मारिया व्हॅन केरखॉव्ह पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, कोरोनाचा प्रसार वाढ असून आणखी लोकांना या संसर्गाची लागण होऊ शकते. तसेच कोरोना हा हंगामी विषाणू असल्याचे कोणतेही संकेत अथवा पुरावे नाही. कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी लोकांना शक्य ते सर्व करण्याचा सल्ला दिला आहे. ( जसे सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आणि गर्दी टाळणे इ. )

१०० दिवसात न्यूझीलंडमध्ये एकही रुग्ण नाही
मार्च महिन्यात केलेल्या कडक लॉकडाऊन मुळे न्यूझीलंड मध्ये कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. त्यावेळी देशातील १०० जण संसर्गित झाले होते. तर गेल्या १०० दिवसात एकही रुग्ण संक्रमित झालेला नाही. गेल्या तीन महिन्यात या देशात काही जणांना लागण झालेली असून ते बाहेरील देशातून प्रवास करणारे आहेत. त्यांना सीमेवरच क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.

फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्यात लक्षात घेता मास्क घालणे अनिवार्य केले आहे. त्याअंतर्गत ११ वर्षावरील सर्व लोकांना मास्क परिधान करुन सार्वजनिक ठिकाणी जावे लागणार आहे. तसेच एखादी व्यक्ती त्याचे उल्लंघन करत असेल तर त्याला १२१ डॉलर म्हणजे ९००० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

भारतात टेस्टिंग करण्यावर भर
भारतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग केल्या जात आहे. त्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या काही आठवड्यात रोज १० लाख टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेणेकरून भारतातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यास मदत मिळेल. देशात सध्या २२ लाख ६८ हजार ६७६ कोरोना रुग्ण आहेत. तर ४५ हजार २५७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.