महाराष्ट्रात का वाढवला लॉकडाऊन ? आरोग्य मंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याला सरकारने अनलॉक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे काही निर्बंधांसह जिल्ह्या व्यवहार सुरु राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निर्बंध कायम राहण्याचेच संकेत दिले होते. लोक नियमांचं पालन करत नाहीत. अनावश्यक घराबाहेर निघतात त्यामुळेच असे निर्णय घ्यावे लागतात असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. लोकांनी निष्काळजी राहू नये असं आवाहनही त्यांनी केलं.

टोपे पुढे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे काही नियम लादणे आवश्यक आहे. मात्र, सरकार अनलॉक करण्याचाच प्रयत्न करत आहेत. आता फारसे निर्बंध नाहीत. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी काही गोष्ट करणे गरजेचं आहे. त्यासाठीच नियमांचे पालन केलं पाहिजे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात यांचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. अनलॉक झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे.