Coronavirus Latest Updates : 8 राज्यात 2000 पेक्षा जास्त ‘कोरोना’ केस, मृत्यूंचा आकाडा 45 हजारच्या पुढे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 53,600 नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत आणि 871 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महामारीचा वेग असा आहे की, 24 दिवसांत कोविड-19 ची प्रकरणे 10 लाखांवरून वाढून 22 लाख झाली आहेत. मागील 4 दिवसात प्रतिदिन 60,000 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, बरे होणार्‍या रूग्णांची संख्यासुद्धा वेगाने वाढत आहे आणि ती वाढून 15 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आकड्यांनुसार मागील 24 तासात 47,745 लोक बरे झाले आहेत. भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सुमारे 70 टक्के आहे आणि मृत्यूदर घसरून सुमारे 2 टक्के झाला आहे.

17 जुलैला भारतात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 10,03,832 होती आणि मृत्यूंचा आकडा 25,602 होता. 7 ऑगस्टला कोरोना व्हायरसच्या प्रकरणांची संख्या 20,27,074 झाली आणि मृत्यूंचा आकडा 41,585 वर पोहचला. देशात कोविड-19 ची प्रकरणे 1 लाखांवर पोहचण्यास 110 दिवस लागले. प्रकरणांची संख्या 2 लाखांपर्यंत पोहचण्यासाठी 14 दिवस लागले, तर त्याच्या पुढील 18 दिवसांत एकुण संख्या 4 लाखांवर पोहचली.

भारतातील कोरोनाचे आकडे

* मागील 24 तासात कोरोनाने झालेले मृत्यू 871
* मागील 24 तासात संक्रमितांची संख्या 53,600
* कोरोनाची एकुण प्रकरणे 22,68,675
* एकुण मृत्यू 45,257
* एकुण अ‍ॅक्टिव्ह केस 6,39,929
* बरे झालेले एकुण रूग्ण 15,83,489

महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे
* महाराष्ट्रात एकुण प्रकरणे – 5,24,513
* बरे झालेले रूग्ण – 3,58,421
* मृत्यू – 18,050

आठ राज्यात जास्त कहर
आंध्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडु, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल, ही 8 राज्य अशी आहेत, जेथे कोरोना महामारीमुळे 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अरुणाचल, मिझोराम आणि सिक्किम अशी राज्य आहेत जेथे 5 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचलमध्ये 3, सिक्किममध्ये 1 रूग्णाचा मृत्यू झाला आहे आणि मिझोराममध्ये या आजाराने कुणाचाही मृत्यू झालेला नाही.