Coronavirus in India : टेन्शन पुन्हा वाढले, देशात 24 तासात कोरोनामुळे 3786 मृत्यू; 3.83 लाख नवीन केसमुळे खळबळ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या वेगावर अजूनही ब्रेक लागलेला नाही. दोन-तीन दिवसात कोरोनाची प्रकरणे कमी दिसत असली तरी देशासाठी अजूनही संकट कायम आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकरणांसह मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात मंगळवारी अवघ्या एका दिवसात 3 लाख 82 हजारपेक्षा जास्त केस समोर आल्या, ज्या सोमवारच्या तुलनेत सुमारे 28 हजार केस जास्त आहेत. भारतात कोविड-19 च्या प्रकरणांनी दोन कोटींचा आकडा पार केला आहे आणि अवघ्या 15 दिवसात संसर्गाची 50 लाखपेक्षा जास्त प्रकरणे आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, मंगळवारी (4 मे) एका दिवसात कोरोना व्हायरसची 382,691 नवी प्रकरणे समोर आली, तर या दरम्यान आतापर्यंत सर्वात जास्त 3,786 लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी सोमवारी (3 मे) एका दिवसात 355,828 नवीन केस समोर आल्या होत्या. याच दरम्यान 3,438 लोकांचा मृत्यू झाला होता. रविवारी सुद्धा मृतांचा आकडा 3400 च्या जवळच होता. मात्र, कोरोनाची प्रकरणे 3 लाख 70 हजारच्या जवळपास होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, कोरोना व्हायरसची एका दिवसात 382,691 नवी प्रकरणे आल्याने संसर्गाची प्रकरणे वाढून 20665524 वर पोहचली तर आणखी 3786 लोकांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या 226194 वर पोहचली आहे. भारतात कोविड-19 च्या प्रकरणांनी 19 डिसेंबरला एक कोटीचा आकडा पार केला होता ज्याच्या 107 दिवसानंतर पाच एप्रिलला संसर्गाची प्रकरणे 1.25 कोटीवर पोहचली. मात्र, महामारीच्या प्रकरणांना 1.50 कोटींचा आकडा पार करण्यासाठी अवघे 15 दिवस लागले.

भारतात कोविड-19 ची प्रकरणे 7 ऑगस्टला 20 लाखांच्या पुढे गेली होती. यानंतर संसर्गाची प्रकरणे 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख आणि 16 सप्टेंबरला 50 लाखांच्या पुढे गेली होती. तर 19 एपिलला 1.50 कोटीच्या पुढे गेली होती.