Coronavirus : ‘लिजेंड’ राज कुमारनं ‘लॉकडाऊन तोडणाऱ्या शिकवला ‘धडा’ ! अजय देवगणनं शेअर केला ‘व्हिडीओ’

पोलीसनामा ऑनलाईन :जगभर थैमान घालणारा कोरोना भारतातही पाय रोवताना दिसत आहे. अशात कोरोना प्रसाराची ही साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारनं देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळं आता सर्वांनी घरात रहाणं गरजेचं आणि बंधनकारक आहे. 14 एप्रिल 2020 पर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनला काही लोक गांभीर्यानं घेत नाहीत असंही चित्र पहायला मिळत आहे.

बॉलिवूड स्टार, पोलीस, डॉक्टर सर्वजण लोकांना घरात राहण्यासाठी अपील करत आहेत. याच पार्वशभूमीवर आता अभिनेता अजय देवगण यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे जो लोकांना घरात राहण्याचा संदेश देत आहे. काहीसा कॉमेडी असणाऱ्या या व्हिडीओतून मोलाचा संदेश देण्यात आला आहे लोकांना लॉकडाऊन न तोडण्यासाठी आवाहन केलं आहे.

व्हिडीओत एक हिंदी सिनेमातील लिजेंड हिरो राज कुमार यांच्या एका सिनेमातील सीन आहे. ज्याला त्यांच्यात आवाजात डब करण्यात आलं आहे. ज्यात लॉकडाऊन संबंधित डायलॉग एडिट करण्यात आले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप भावला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ लाईक करत रिट्विट केला आहे. तर काहींनी कमेंट करत आपली प्रतिक्रियादेखील दिली आहे.