दिलासादायक ! रुग्णांच्या संख्येत घट तर रिकव्हरी रेट वाढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशातून 42 लाख 80 हजार423 कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. असे असले तरी आज गेल्या दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज एका दिवसात 75 हजार 809 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत 90 हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असताना आजची आकडेवारी दिलासा देणारी आहे. याच दरम्यान देशात 1133 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 72 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 74 हजार 123 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 33 लाख 23 हजार 951 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशामध्ये 8 लाख 83 हजार 697 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारताच्या तुलनेत अमेरिकेत गेल्या 24 तासात 25325 आणि ब्राझिलमध्ये 10188 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका दिवसात अमेरिकेत 286 आणि ब्राझीलमध्ये 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त नवीन प्रकरणं समोर येत आहेत.

देशात 5 कोटीहून अधिक टेस्टिंग

देशात कोरोना टेस्टिंगचा आकडा 5 कोटी पार झाला आहे. या 5 कोटी टेस्टमध्ये 8.74 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आयसीएमआरच्या मते 24 तासात 7 लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली. टेस्टिंगमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. यात भारताचा तिसरा क्रमांक लागतो.