दिल्लीत रुग्णालयाला भीषण आग; पाच रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतही कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. रोखण्याचा प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न होत आहे अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायपुरच्या पचपेडी नाक्यावरील राजधानी रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरु होते. हि आग रुग्णालयाच्या आयसीयू विभागात लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरु होते. यावेळी ५० बाधित रुग्णालयात होते. आयसीयू विभागात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. खिडकी तोडून धूर बाहेर काढण्यात आला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या आगीची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी तत्काळ दाखल झाले झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

 

 

 

 

या आगी मागील कारण रुग्णालयातील पंख्याला झालेलं शॉर्ट सर्किट सांगितलं जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आग लागल्यानंतर काही रुग्ण स्वत:च उठून बाहेर निघून गेले. ज्या आयसीयू सेंटरला आग लागली होती, तेथे गोंधळ निर्माण झाला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे या आगीने भीषण रुप धारणा केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या आगीत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना मदतनिधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

 

 

 

 

 

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कोरोनाने कहर केला आहे. बाधितांना बेड उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत आहे. याच दरम्यान मृतदेहावर रहिवासी कॉलनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.