मध्यप्रदेश सरकारचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले – ‘महाराष्ट्राने ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवला’

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत आले. बाधितांच्या संख्येने एक कोटींचा टप्पा पार केला आहे. दररोज दोन लाख नवे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या संख्येमुळे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यातच रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. काही राज्यांमध्ये अत्यंत बिकट अवस्था आहे. दरम्यान ऑक्सिजन मशीन पुरवठ्यावरून मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन मध्यप्रदेशला पाठवू नये यासाठी महाराष्ट्रातील कंपन्यानवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर पुरवठ्यावर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्रतील निर्माता कंपन्यांकडे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची ऑर्डर दिली होती, मात्र या पुरवठ्या कंपन्यांवर महाराष्ट्र सरकारने दबाव टाकला आहे. त्यामुळे त्यांनी अजून पर्यंत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन पाठवल्या नाहीत असा आरोप शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत राज्यामध्ये उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता याबाबत माहिती दिली. याच बैठकीदरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी सध्या दोन हजार ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मध्य प्रदेशात आले आहेत, तर ६५० कॉन्सनट्रेटर अजून येणार आहेत. १ हजार ३०० कॉन्सनट्रेटर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केले आहेत. परंतु, ऑक्सिजन मशीन तयार करणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्राला आधी मशीन द्याव्यात असा दबाव ठाकरे सरकारने टाकल्याचे म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

देशात कोरोनाचे लसीकरणचा वेग वाढवला गेला आहे. देशात कोरोना लसीकरण देखील वेगाने होत आहे. एका तज्ज्ञाने दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांसाठी तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोनाची दुसरी लाट अजून १०० दिवस कायम राहू शकते. त्यामुळे ७० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. लोकांची प्रतिकारक शक्ती लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर बरं झाल्यानंतर विकसित होते. संसर्गजन्य रोगांपासून सामूहिक रोग प्रतिकारक शक्तीमुळे लोकांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळतं. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमध्ये लोकांची प्रतिकारक शक्ती कमी करण्यासोबतच लसीचा प्रभाव कमी करण्याची क्षमता आहे. तो अधिक संक्रमक आहे. त्यामुळे लास घेऊनही पुन्हा बाधित होण्याची शक्यता आहे असे डॉ. नीरज कौशिक यांनी सांगितले.