खळबळजनक ! कोरोनामुळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू; धक्क्याने सुनेनेही घेतला गळफास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने माणसाचे जीवन विस्कळीत केलं आहे. अनेक लोक कोरोना विषाणूने मृत्यू पडत आहेत. तर अनेक लोक मनात धसका बसून आत्महत्या करीत आहेत. मध्य प्रदेश मधील अशीच एक मन थरथरून टाकणारी घटना घडली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आख्खा संसार उध्वस्त झाला आहे. एका कुटूंबातील कोरोनाने तब्बल तिघे मृत्यू पावल्याने या धास्तीने सहन न झाल्याने त्या सुनेनेही आत्महत्या करून आपला प्राण घालवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, बालकिशन गर्ग यांच्या पत्नी चंद्रकला यांचं कोरोनामुळे १४ एप्रिलला रोजी मृत्यू झाला. त्यानंतर २ दिवसांनी मुलगा संजय आणि स्वपनेश यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील सदस्यांच्या मृत्यूने सून रेखा यांना मोठा धक्का बसला होता. याच धक्क्यामध्ये त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे आठवड्याभरात या कुटुबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.