Coronavirus : भारतात किती टक्के पेशंट ऑक्सिजन सपोर्टवर ?, डॉ. हर्षवर्धन म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात आतापर्यंत १२,७१,००,००० हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,५३,२१,०८९ पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,८०,५३० वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी २०,३१,९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १,३१,०८,५८२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर १.९३ टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन १.७५ टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ०.४० टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे. सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर ४.२९ टक्के रुग्ण होते. ते आता ४.०३ टक्के इतके आहेत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. आपण सध्या रुग्णालयामध्ये तात्पुरते बेड बनवत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. रुग्णालयामध्ये मनुष्यबळ वाढवण्यावरही आपण काम करत आहोत. एम्समध्ये अनेक असे डॉक्टर्स आहेत जे दुसऱ्या विभागांमध्ये काम करत आहेत. गेल्या वर्षी होम आयसोलेशनमध्ये ८० टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. यावर्षी कोरोना रुग्णांच्या उपचारात आपली सुरुवात चांगली आहे. पण आपल्याला आरोग्य सुविधा आणखी वाढवण्याची गरज आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना रिलायन्स राज्यांना दररोज तब्बल ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. यामुळे ७० हजार रुग्णांचा जीव वाचणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडे आपल्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज ७०० टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार करत आहे. कोरोनाचा सामना करत असलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पुरविल्या जाणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज ७०,००० हून अधिक गंभीर रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून १००० टन करण्याची योजना आहे. अनेक नर्सेस आहेत ज्यांनी गेल्या वर्षी करोनात थेट काम केले नाही. पण आता आपण मनुष्यबळ वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाच्या उपचारासाठी सक्षम बनवत आहोत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात रिलायन्सने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या संकटात काही राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे. कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला १०० टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित ७०० टन करण्यात आले.