रिलायन्सकडून मोठा दिलासा ! दररोज तब्बल 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. बाधितांची संख्या दीड कोटींवर गेली आहे. संसर्ग थांबवण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत मात्र बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रेमडेसिविर इंजेक्शननंतर आता ऑक्सिजन पुरवठाही कमी पडू लागला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक राज्यात अशीच परिस्थतीत आहे. मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना रिलायन्स राज्यांना दररोज तब्बल ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. यामुळे ७० हजार रुग्णांचा जीव वाचणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात बाधितांची संख्या दररोज दोन लाखांहून अधिक आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. डेसातील बाधितांची संख्या १,५३,२१,०८९ वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या १,८०,५३० झाली आहे. तर २०,३१,९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. ऑक्सिजन अभावी काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवालही उपस्थित होत आहे.

दरम्यान, या संकटात रिलायन्सने मोठा दिलासा दिला आहे. दररोज तब्बल ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा देशातील राज्यांना रिलायन्स करत आहे. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज ७०० टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार करत आहे. विशेष म्हणजे काही राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे.

गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आदी राज्यात बिकट अवस्था असून या राज्यात पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे दररोज ७०, ००० हून अधिक गंभीर रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून १००० टन करण्यात येणार आहे .

कच्चे तेल डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनासारख्या उत्पादनांची निर्मिती रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीमध्ये होत असल्याने तिथे मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार होत नाही. परंतु, ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता रिलायन्सने वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सक्षम असलेली यंत्रणा बसविली असून औद्योगिक ऑक्सिजन तयार करण्याच्या सुविधांचा उपयोग केला जात आहे.विशेष म्हणजे टँकरमध्ये मायनस 183 डिग्री सेल्सियसमध्ये ऑक्सिजन ठेवला जातो. कंपनीच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून परिवहन खर्चासह राज्य सरकारांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जात आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे, गेल्या १२ दिवसांत बाधितांचा रेट दुप्पट झाला आहे. देशातील १० राज्यांमध्ये ७८ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांकडून वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी भारतासाठी पुढील तीन आठवडे महत्त्वाचे असून कोरोनाचे नियम हे पाळावे लागतील असे म्हंटले आहे. देशात जर बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि लसीची कमतरता कायम राहिल्यास भयंकर स्थिती उद्भवेल असेही त्यांनी सांगितले आहे.