Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये अकडले पोलिस उपनिरीक्षक अशरफ अली, आता DSP मुलीच्या देखरेखीखाली काम करतायेत

सीधी (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था –  कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये जे लोक आपल्या नातेवाईक किंवा इतरांना भेटण्यासाठी गेले आहेत ते सर्वजण लॉकडाऊनमुळे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील मजोली पोलीस ठाण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एक पोलीस उपनिरीक्षक वडील सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण घेत असलेल्या DYSP मुलीला भेटण्यासाठी गेले. मात्र, लॉकडाऊनमुळे ते त्याच ठिकाणी अडकले आणि आता ते मुलीच्या हाताखाली आपले कर्तव्य बजावत आहेत.

काय प्रकरण आहे?
मुलगी शबरा अन्सारी सिधी जिल्ह्यातील मजौली पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्यरत आहे. त्याचवेळी त्यांचे वडील पोलीस उपनिरीक्षक अशरफ अली हे इंदूरच्या लासुडिया पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. परंतु जनता कर्फ्यूच्यावेळी अशरफ अली आपल्या बलिया येथील घरी गेले होते. परत येताने ते मुलीला भेटण्यासाठी सिधी जिल्ह्यात गेले. याच दरम्यान लॉकडाऊनची घोषणा झाली. यानंतर पोलीस मुख्यालयाच्या आदेशानुसार आणि पोलीस अधीक्षक आरएस बेलवंशी यांच्या निर्देशानुसार अशरफ अली अंसारी हे मजोली पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत.

अशरफ अली यांची 1988 मध्ये कॉन्स्टेबल पदावर निवड झाली. पदोन्नतीनंतर ते आता इंदूरमधील लुसुडिया पोलिस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर त्यांची मुलगी शाबेरा अंसारी 2013 मध्ये पोलीस निरीक्षक झाली. त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि 2016 मध्ये त्यांची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाली. सध्या त्यांचा प्रशिक्षण कालावधी सुरु आहे आणि सिधी जिल्ह्यातील मजोली पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत मुलीच्या अधीन राहून देश सेवा करणाऱ्या वडिलांची सध्या चर्चा सुरु आहे.