Lockdown : देशभरात 21 दिवसांचं ‘लॉकडाऊन’, घराकडे जाणार्‍या विद्यार्थीनीवर 10 जणांकडून आळीपाळीनं सामूहिक बलात्कार

रांची : वृत्तसंस्था  – देशात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट असून याचा फायदा नराधमांनी घेतला आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर 10 जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार झारखंडमधील दुमका शहराजवळ 24 मार्च रोजी घडला. पीडित तुरुणी दुमका शहरातील शिवपहार येथे भाड्याच्या घरात राहत असून एसपी महाविद्यालयात शिकते. लॉकडाऊनमुळे महाविद्यालयाला सुट्टी असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. 24 मार्चला ती एका मैत्रिणीसह घरी परतत असताना गावाच्या वेशीवर तिला सोडून मैत्रिण निघून गेली. पीडित तरुणीने आपल्या घरच्यांना बोलावून घेतले होते. रात्र झाली तरी घरचे आले नसल्याने तिने गावातील मित्र विक्की उर्फ प्रसन्नजित हंसदा याला फोन करून बोलावून घेतले. विकी मित्रासोबत पीडित तरुणी थांबली होती त्या ठिकाणी आला.

विकीने घरी जाण्याऐवजी दुसऱ्या वाटेवरून दुचाकी घेतली. त्यावेळी तिने विकीला हा रस्ता घराकडे जात नसल्याचे सांगितेल त्यावेळी तो म्हणाला, रस्त्यावर तपासणी सुरु आहे. म्हणून आपण कच्चा रस्त्याने घरी जात असल्याचे सांगितले. काही अंतर गेल्यानंतर विकीने निर्जन जंगलाजवळ दुचाकी थांबवून शौचालयाला जाऊन येते असे सांगितले. त्यावेळी पीडित तरुणी वीकी सोबत आलेल्या अज्ञात मित्रासोबत जंगलात उभी होती. त्यानंतर विकी आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आठजण तोंडाला रुमाल बांधून त्या ठिकाणी आले. त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

आठ जणांनी तरुणीवर चाकूचा धाक दाखवून रात्रभर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिला गंभीर अवस्थेत जंगलात सोडून नराधम पळून गेले. 25 मार्चला सकाळी शुद्धीवर आल्यावर तरुणी जंगलातून रस्त्यावर आली. गावकऱ्यांनी तिला पाहताच याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. घरच्यांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून शोध सुरु केला आहे.