मुलासाठी आईनं केली विनंती, खासगी रेल्वेनं राजस्थानमधून मुंबईत पोहचवण्यात आलं ऊंटनीचं दूध, ‘या’ IPS अधिकार्‍यानं मानले रेल्वेचे ‘आभार’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. लोक सर्वत्र अडकले आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. या दरम्यान, असे एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात एका महिलेने आपल्या आजारी मुलासाठी विनवणी केली, त्यानंतर 20 लिटर मादी उंटांचे दूध त्यांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले.

दरम्यान, ही संपूर्ण घटना मुंबईची आहे, येथे चेंबूरच्या एका महिलेने ट्विटरवर मदतीची मागणी केली. तिने लिहिले की, तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा ऑटिझम आणि ऍलर्जीमुळे झगडत आहे. तो फक्त मादी उंटाचे दूध आणि थोडीशी डाळ खालून जिवंत आहे आणि लॉकडाऊन परिस्थितीत मादी उंटाचे दूध मिळणे अशक्य आहे. महिलेने लिहिले की, येत्या काही दिवसांत दूध संपेल आणि मुलासाठी याची खूप गरज आहे. हे दूध राजस्थानमध्ये मिळेल, असेही या महिलेने लिहिले आहे. यांनतर, महिलेचे हे ट्विट व्हायरल झाले. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरवात केली. यानंतर आयपीएस अरुण बोथरा यांनी यावर उत्तर दिले. राजस्थानमधील आयपीएसने महिलेशी संपर्क साधला. अरुणनेच राजस्थानच्या काही रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि महिलेपर्यंत दूध पोहचविण्याची काम सुरूवात केली.

आयपीएस अरुण बोथरा यांनी या प्रकरणात ट्वीट केले की, अजमेरचे वरिष्ठ डीसीएम महेश चंद जुरालिया यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. लुधियाना ते वांद्रे दरम्यान सुटणारी पार्सल कार्गो ट्रेन 00902 राजस्थानातील फलना स्टेशन येथे थांबविली जाईल आणि तेथून दूध उचलून मुंबईतील महिलेला दिले जाईल. यानंतर उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक तरुण जैन यांनी अजमेरमधील आपल्या अधिकाऱ्यांना मादी उंटाच्या दुधाची व्यवस्था करण्यास सांगितले. अधिका्यांनी दुधाची व्यवस्था केली. लुधियानाह ते वांद्रेकडे जाणारी पार्सल ट्रेन फालना येथे पोहोचली. येथून २० लिटर दुध घेऊन ट्रेन मुंबईकडे रवाना झाली.

मुंबईला पोहोचताच अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतर गाडी थांबविली आणि वांद्रे येथील महिलेला दूध पाठविण्यात आले. अरुण बोथरा यांनी नंतर सांगितले की, 20 लिटर दुधाचे रेल्वेने मुंबईत आगमन झाले आहे. याबद्दल बोथरा यांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले.