Coronavirus Lockdown 3.0 : पुण्यात कोणती दुकानं कोणत्या दिवशी उघडी राहणार, महापालिकेनं दिली ‘ही’ सविस्तर माहिती, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि राज्यात देखील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातुनच पुणे शहर हे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे पुणे शहराची विभागणी दोन भागांमध्ये करण्यात आली असून त्यामध्ये प्रतिबंधित (संक्रमणशील म्हणजेच कंटेन्मेंट झोन) आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील (संक्रमणशील क्षेत्र सोडून म्हणजेच नॉन कंटेन्मेंट झोन) परिसराचा समावेश आहे. या दोन्ही परिसरात काय उघडे राहणार आणि काय नाही याबाबत पुणे महानगरपालिकेने सविस्तर माहिती दिली आहे. ती खालील प्रमाणे आहे.

1. संक्रमणशील क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) – सकाळी 10 ते दुपारी या कालावधीत दुध, भाजीपाला, फळे, मटन, चिकन व अंडी यांची किरकोळ विक्री सुरू राहील. सर्वपक्रारचे दवाखाने, हॉस्पीटल्स, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने सुरू राहतील. याशिवाय या परिसरात कोणतीही दुकाने उघडी राहणार नाहीत.

2. संक्रमणशील क्षेत्र वगळून (नॉन कंटेन्मेंट झोन) –

अ. अत्यावश्यक दुकाने व सोवा – दुध, भाजपीला, फळे, किराणा दुकाने, मटन, चिकन व अंडी विक्री, सर्व प्रकारचे दवाखाने, हॉस्पीटल्स, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने ही सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान सुरू राहतील.

ब. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मॉल, व्यापारी संकुले हे उक्त लॉकडाऊन कालावधीत बंद राहतील. तसेच लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, टिकळ रोड, अप्पा बळवंत चौक परिसर, कुमठेकर रोड, एम.जी. रोड, कोंढवा रोड, ज्योती हॉटेल ते एनआयबीएम रोड या रस्त्यावरील अत्यावश्यक नसलेली कोणतीही दुकाने व सेवा सुरू करण्यास मनाई आहे.

क. नागरी वसाहतीमधील व संकुलामधील अत्यावश्यक वस्तु व्यतिरिक्त एकल दुकाने सुरू राहतील.

ड. एक रस्ता किंवा गल्लीमध्ये अशा प्रकारच्या जास्तीत जास्त पाच दुकानांनाच प्रति 1 किलोमीटर प्रमाणे मुभा असेल. मात्र अशा दुकानांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे शहर अद्यापी रेड झोनमध्येच असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये केवळ खालील प्रकारच्या व्यवसायांना परवानगी देण्यात येत आहे. सदरची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान सुरू राहणार आहेत.

1. सोमवार/बुधवार/शुक्रवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने-सामुग्री व मोबाईल विक्री व दुरूस्ती, इलेक्ट्रीक वस्तु विक्री व दुरूस्ती, भांडयाची विक्री दुकाने.

2. मंगळवार/गुरूवार/शनिवार/रविवार – वाहनांचे दुरूस्तीच्या गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपडयांची दुकाने, डेअरी उत्पादने.

ई. जीवनावश्यक वस्तुंचे व औषधांचे आणि तयार अन्न पदार्थांचे घरपोच वाटप सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान राहील.

टीप – अत्यावश्यक असलेल्या व अत्यावश्यक नसलेल्या ठिकाणांबाबत खालील सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

1. प्रत्येक दुकानांमध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असणार आहे.

2. दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र देणे गरजचे आहे.