लॉकडाऊन 5.0 मध्ये कुठं मिळणार सूट अन् कुठे असणार बंदी, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाउन 5.0 ची गाईडलाइन सरकारने जारी केली आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सरकारकडून चरणबद्ध पद्धतीने सूट दिली गेली आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. ही गाईडलाईन 1 जूनपासून 30 जूनपर्यंत जारी राहील.

कर्फ्यूतून मिळाला दिलासा
नव्या निर्देशांनुसार रात्रीचा कर्फ्यू जारी राहील. ज्या जरूरी गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी कोणताही कर्फ्यू राहणार नाही. रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत आता नाईट कर्फ्यू राहील. आतापर्यंत सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू होता. शाळा-कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडण्याचा निर्णय सरकार नंतर घेईल.

धार्मिक स्थळ उघडण्यास परवानगी
मंदिर-मशीद-गुरुद्वारा-चर्च उघडण्यात येतील. अनेक राज्यांची मागणी आहे की, मॉलसुद्धा उघडण्यात यावेत, पण ते टप्प्या-टप्पयाने उघडण्यात येणार आहेत. शाळा-कॉलेज जुलैपासून उघडले जाऊ शकतात. 8 जूनपासून रेस्टॉरन्ट घडतील. पहिल्या टप्प्यात मंदिर, हॉटेल, रेस्टॉरन्ट, शॉपिंग मॉल 8 जून 2020 पासून उघडण्याची परवानगी दिली जाईल.

अंतरराज्य, अंतरजिल्हा प्रवास बंदी हटवली
गृह मंत्रालयाच्या नव्या निर्देशानुसार एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. तसेच राज्यात सुद्धा एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या दरम्यान लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. नव्या नियमानुसार आता कुठेही जाण्या-येण्यासाठी कुणाचीही परवानगी लागणार नाही.

राज्य सरकारांना घ्यायचा आहे निर्णय
लॉकडाउन 5.0 मध्ये राज्य सरकारांना अधिक शक्ती देण्यात आली आहे. आता राज्य सरकार ठरवणार की, राज्यातील बस आणि मेट्रो सेवा कशी सुरू करायची आहे. नव्या निर्देशात म्हटले आहे की, केंद्र सरकारने प्रतिबंध हटवले आहेत, परंतु राज्य सरकार आपल्या स्तरावर प्रतिबंध लावू शकतात.