Coronavirus Lockdown : ‘अफवा’ पसरविल्यानं राज्यात 51 जण ‘गोत्यात’, होऊ शकते 6 महिन्यांची ‘जेल’वारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर सोशल मीडियावर या अनुषंगाने चुकीची माहिती पसरविणे अनेक महाड्टाागांना महागात पडले आहे. महाराष्ट्र सायबरने मार्च महिन्यात तब्बल 51 गुन्हे दाखल केले आहेत. सर्वाधिक गुन्हे हे सातारा, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेकडून व्हॉट्सॲप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, टिकटॉकसह यूट्यूबवर वॉच ठेवण्यात येत असून, चुकीची पोस्ट, व्हिडीओ आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात संसर्ग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. यानंतर तातडीने राज्य सरकारने विशेषत: गृह विड्टाागाने कडक पावले उचलत समाज माध्यमातून या व्हायरस संदड्टारत ज्या काही अफवा पसरविण्यात येत होत्या, त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरला विशेष निर्देश देत तातडीने अशा समाज विघातक घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग रजपूत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत टीमने सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले. त्यामध्ये केंद्र सरकारचा हवाला देत सोशल मीडियावर लॉकडाऊन संदड्टारत एक पोस्ट व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या पोस्टमध्ये वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये पाचपेक्षा जास्त कर्मचारी न ठेवण्याचे निर्देश दिले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. या पोस्टच्या मुळाशी जात महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल केला. यानंतर यूट्यूब, व्हॉट्सॲप, व्टिटर आणि टिकटॉकवरही कोरोना व्हायरस संदड्टारत समाजात चुकीच्या पद्धतीने ड्टाीतीचे वातावरण तयार होईल, अशा पद्घतीने पोस्ट व्हायरल होत असल्याचे आढळून आल्यानंतर ३० मार्चअखेर जवळपास ५१ गुन्हे समाज विघातक घटकांवर दाखल केले आहेत. यामध्ये बीड, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, ड्टांडारा, गोंदिया, नांदेड, रत्नागिरी, सोलापूर याठिकाणी प्रत्येकी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्हानिहाय गुन्ह्यांची माहिती
महाराष्ट्र सायबरअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील २५ पोलीस ठाण्यांमध्ये कोरोना व्हायरसबाबत चुकीची माहिती पसरविल्याचे गुन्हे दाखल केलेले आहेत. यामध्ये नागपूर १, अकोला १, बीड ५, ड्टांडारा ३, चंद्रपूर १, गोंदिया ३, पुणे ग्रामीण २, सातारा ५, वर्धा १, कोल्हापूर ४, पुणे शहर १, नांदेड ३, रत्नागिरी २, सोलापूर शहर १, नाशिक १, सोलापूर ग्रामीण २, मुंबई शहर ४, पिंपरी चिंचवड १, सिंधुदुर्ग २, बुलढाणा १, जालना १, ठाणे शहर ३, नागपूर ग्रामीण १, सांगली १ याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोना व्हायरससंदड्टारत चुकीची पोस्ट शेअर करून समाजात ड्टाीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र सायबरने सर्व सोशल माध्यमांवर लक्ष केंद्रीत केले आहे. चुकीची पोस्ट शेअर केल्यास तातडीने गुन्हे दाखल केले जात आहेत. जनतेनेही योग्य ती काळजी अणि पोस्टची सत्यता तपासूनच पोस्ट शेअर करावी.

– बाळसिंग रजपूत, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर.