लॉकडाऊनच्या अगोदरपासून मुलं आहेत घरात, मनावर होतोय गंभीर परिणाम, ‘या’ 9 प्रकारे घ्या काळजी

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीपासून मुलं घरात आहेत. मोठी माणसं काही ना काही कामानिमित्त बाहेर पडत आहेत, पण लहान मुलं अजूनही खुपच कमी प्रमाणात बाहेर पडत असल्याने त्यांच्या मनावर खुप गंभीर परिणाम होत आहेत. कोरोनाची भिती, मोठ्यांच्या गप्पा आणि इतर गोष्टींमुळे ती सतत दडपणाखाली राहाणे धोकादायक ठरू शकते. नकारात्मक परिणाम लहान मुलांच्या मानसिक आरोग्या(health)वर होत आहे. ब्रिटेनमध्ये मानसिक आजारांचा इतिहास असलेल्या 2 हजार 111 मुलांवर चॅरिटी यंगमाइंट्सद्वारे रिसर्च करण्यात आला होता. यात 83 टक्के मुलं लॉकडाऊनमुळे मानसिकरित्या प्रभावित आढळून आली होती.

अशी घ्या मुलांची काळजी

1 मुलांच्या मनातील कोरोनाबद्दल असलेली भीती घालवण्याचा प्रयत्न करा.

2 मुलांना जास्तवेळ मोबाईलचा वापर करू देऊ नका.

3 मुलांसोबत एकत्र मिळून खेळ खेळा.

4 मुलांना चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करा. यामुळे मुलं सकारात्मक विचार करतील.

5 मुलांशी आपले अनुभव शेअर करा. एखादी गोष्ट सांगण्यासाठी त्यांना प्रेरित करा.

6 जास्तीत जास्त शारीरीक हालचाली होतील, याकडे लक्ष द्या.

7 सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांना उभे राहू द्या.

8 पौष्टिक आहार द्या.

9 सुरक्षित मोकळ्या जागेत त्यांना खेळू द्या.