Coronavirus Lockdown: अनुष्का शर्मानं स्वत:चंच मीम्स शेअर करत केलं स्वत:लाच ‘ट्रोल’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक बॉलिवूड स्टार आपले थ्रोबॅक व्हिडीओ किंवा फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत असते. तिच्या सोशल अ‍ॅक्टीविटीज पाहून लक्षात येत आहे की, ती पती विराट कोहलीसोबत खूप मजा करत आहे. अनुष्कानं आता स्वत:वरच मीम्स तयार केल्यानं ती चर्चेत आली आहे.

अनुष्कानं नुकतंच सोशल मीडियावर मीम्स शेअर केलं आहे. खास बात अशी की, हे मीम्स तिच्यावरच आहे. तिनं स्वत:लाच ट्रोल केल्यानं ती चर्चेत आली आहे. अनुष्कानं स्टेटसला एक फोटो शेअर केला आहे. एका फोटोत ती ग्लॅमरस दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती साडीच्या लुकमध्ये दिसत आहे. एकदम साध्या अवतारात. तिचा हा लुक सुई धागा या सिनेमातील आहे. अनुष्कानं पहिल्या फोटोला म्हटलं क्वारंटाईन डे 1 आणि दुसऱ्या फोटोला म्हटलं आहे क्वारंटाईन डे 21. फोटो शेअर करताना अनुष्का म्हणते, बोर होत असाल, चला थोडं हसूया.”
image.png
सध्या अनुष्काचं हे स्टेटस खूप व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या मीम्सची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चाहत्यांनाही अनुष्कानं शेअर केलेलं हे मीम्स खूप आवडलं आहे.