Corona Lockdown : अडकलेल्या मजुरांना ‘घरी’ पोहचवणार, CM योगींचा खास ‘प्लान’

लखनऊ : वृत्तसंस्था – देशात कोरनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजुरांना आपल्या घरी परतण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. अनेक मजूर पायी आपल्या गावी परतत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतर राज्यात अकडलेल्या मजुरांना आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतलाय. 14 दिवस क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्या मजुरांना राज्यात परतण्यासाठी मदत पुरवली जाणार आहे. योजनाबद्ध पद्धतीने हे काम करण्यासाठी योगी सरकारनं परवानगी दिली आहे. यासाठी त्यांनी आपल्या टीम 11 सोबत घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले आहेत.


आपल्या टीम 11 सोबत घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, मजुरांना राज्यात आणण्यासाठी एक कार्य योजना तयार केली जावी. ज्यामध्ये इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांची राज्याच्या सीमेवरच चेकिंग व टेस्टिगंसाठी प्लान आखण्यात यावा. प्रदेशाच्या सीमेत आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार या मजुरांना त्यांच्य जिल्ह्यापर्यंत आपल्या बसच्या मध्यमातून पोहचवण्यास मदत करेल, असे त्यांनी या बैठकीत सांगतिले.

प्रत्येक मजुराला 1000 रुपयाची मदत
या योजनेची सुरुवात हरियाणामधून केली जाईल. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील 11 हजार मजूर हरियाणातील क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात या मजुरांसाठी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात यावे. हे सेंटर त्यांच्या गावाच्या जवळपास असतील याची खात्री करण्यात यावी. जिल्ह्यात क्वारंटाईन पूर्ण करून आपल्या घरी परतणाऱ्या प्रत्येक मजुराला 1000 रुपये आणि निश्चित करण्यात आलेले रेशन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश योगींनी दिले.