‘ऑर्चिड’ उत्पादक शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान, शासनाने सहकार्य करण्याची मागणी

लोणी काळभोर पोलिसनामा (शरद पुजारी) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन केल्यामुळे संपूर्ण बाजारपेठांसह सार्वजनीक उत्सव देवालये बंद झाल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय करणारे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे शासनाने पुढाकार घेऊन कमीत कमी हमी भाव देऊन होणारा खर्च तरी निघेल इतपत सहकार्य करावे अन्यथा हे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारत हा कृषी प्रधान देश आहे देशाच्या विकासात सगळ्यात जास्त शेतीचा वाटा आहे. अलिकडे शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतीमालाचे भरघोस उत्पादन घेत आहेत परिणामी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. तसेच या शेतकर्यांनी अंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान अवलंबून फळे व फुलाची शेती विकसित केली.यामध्ये फुल शेतातून मोठे उत्पन्न घेऊन भरपूर कमाई करण्यासाठी अनेकजण पुढे आले.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर येथील प्रगतशील शेतकरी विजय एकनाथ कुंजीर यांनी आपल्या चार एकर शेतात ऑर्चिड फुल शेतीचा प्लाॅट चार वर्षापूर्वी तयार केला.हे अंतरराष्ट्रीय पातळीवर खुप मागणी असलेले फुल आहे.सध्या कुंजीर यांचा संपूर्ण प्लाॅट ओपन झाला असून यातून साधारणपणे सहा हजार गड्ड्या उत्पादन तयार झाले आहे.हे संपूर्ण उत्पन्न वाया जाणार आहे कारण महाराष्ट्रातील सर्व मोठी मंदिरे बंद आहेत तसेच लग्न समारंभ सुध्दा स्थगित करण्यात आले असल्याने या शेतकर्यावर मोठे आर्थीक संकट उभे राहिले आहे. या फुलाच्या एका गड्डीचा बाजारभाव मुल्य तीनशे ते पाचशे इतके आहे.त्यामुळे या दोन महिन्यात साधारणपणे अठरा ते वीस लाख रुपयाचे नुकसान होणार आहे.तसेच या फुलाच्या कापनीनंतर दुसरा बहार गणपती उत्सवात येणार आहे यावर्षी गणपतीवरही कोरोनाचे सावट कायम राहणार असल्याने पुन्हा अठरा ते वीस लाख रुपयाचे नुकसान होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात चार एकरचा ऑर्चिड फुलांचा एकमेव प्लाॅट थेऊर येथील विजय कुंजीर यांच्याकडे आहे दररोज या प्लाॅटवर पंधरा हजार रुपये मजुरीचा खर्च आहे.शासनाने यावर निर्णय घेऊन शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही यासाठी या फुलाची विक्रीची व्यवस्था करावी अशी मागणी विजय कुंजीर यांनी केली आहे.