चीनची भारताला धमकी, म्हणाला – ‘…अन्यथा आर्थिक परिणाम भोगावे लागतील’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : चीन आणि अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु असून शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे भारत आणि अमेरिकेतील संबंध घट्ट होत आहे. यामुळे चीनने भारताला अमेरिकासोबत सुरु असलेल्या शीतयुद्धापासून दूर रहा असा इशाराच दिला आहे.
भारताने अमेरिकेचा सहकारी होऊन जर चीनविरोधात काही कारवाई केली तर कोरोना महामारीच्या या परिस्थितीत आर्थिक परिणाम वाईट होतील असे म्हटले आहे.

भारताने अमेरिका आणि चीनमधील शीतयुद्धापासून दूर राहावं जेणेकरुन दोन्ही देशांमधील व्यवहारिक संबंध पुढेही सुरु राहतील. चीनने भारतासोबतचे व्यवहारिक संबंध चांगले ठेवणे आपलं लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. यामुळे चीन यापुढेदेखील भारतात गुंतवणूक कऱण्यासाठी दोन्ही देशांमधील संबंध चांगले ठेवण्यास उत्सुक असल्याचंही आहे. कोणत्याही परिस्थितीत राजकीय कारणांमुळे भारताला आर्थिक परिणाम सहन करावे लागू नयेत यासाठी चीन प्रयत्न करत आहे.

यामुळे मोदी सरकारला भारत-चीन संबंधांबद्दल सकारात्मक विचार करत पुढील वाटचाल केली पाहिजे. चीनने भारताला फक्त आर्थिक परिणाम भोगण्याची धमकी दिलेली नाही तर कोरोनासंबंधी वाढत्या प्रकरणांमध्ये लॉकडाउन हटवण्यावरुन टीकाही केली आहे. भारत आणि चीनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनच्या सरकारी माडियाने यावर बोलताना, भारत आणि चीनला हा मुद्दा सोडवण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची गरज नसल्याचं सांगितले आहे.