काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये ऑनलाइन सिगारेटची विक्री, दोघे ‘गोत्यात’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने 25 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू केले, ज्याचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपत होता. आता त्यास 3 मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. या काळात केवळ आवश्यक वस्तूंची दुकाने आणि सेवा वगळता सर्व व्यापार बंद आहेत. तरीही अनेक ठिकाणी मादक पदार्थांचा व्यापार सुरूच आहे.

बंगळुरूमधील गुन्हे शाखेने अशा दोन औषध विक्रेत्यांना पकडले आहे, जे ऑनलाइन सिगारेट विक्री करीत होते. त्यांच्याकडून सुमारे 30,000 रुपयांची सिगारेट जप्त करण्यात आली आहे. दरम्यान त्या दोघांना अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले, तर सिगारेट जप्त करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या म्हणण्यानुसार, गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

असे म्हटले जात आहे की, बेंगळुरू सिटी क्राइम ब्रँचने दोघांना तेव्हा अटक केली जेव्हा ते सिगारेटची डिलिव्हरी देण्यास जात होते. अख्तर मिर्झा आणि तबुद्दीन मोहद्दीन असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात पाठविले आहे.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की लॉकडाऊन दरम्यान केवळ रेशन, भाजीपाला-फळ आणि औषधाची दुकाने उघडली जात आहेत. आता वाढते तापमान पाहता गृह मंत्रालयाने पंखे व स्टेशनरीची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. बंदी असूनही सिगरेट व्यवसायाशी संबंधित लोकांनी नवीन मार्ग काढून ऑनलाइन विक्री करण्यास सुरुवात केली.