नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यात कुठेही ध्वजारोहण करण्यात येऊ नये, आदेश जारी

नांदेड:-(माधव मेकेवाड) – कोरोना सारख्या महामारीने महाराष्ट्र नव्हे तर अख्या देशाच लक्ष वेधलं आहे अनेक जण आपल्या जिवाच्या बचावासाठी घरात प्रशासनाच्या आदेशाने बसले आहेत मिळालं तेच खाऊन आपली उपजीविका भागवत आहे.1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन ह्या दिवशी महाराष्ट्र मध्ये ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करतात व तसेच विद्यार्थी 1 ली ते 9 पर्यँत आपली गुण पत्रिका शाळेत वर्ग शिक्षका कडून नेत असतात.कोरोना सारख्या महामारीने कोणी जिल्ह्यात बळी पडू नये म्हणून एक आदेश जारी केला आहे त्यात असे नमूद केले आहे की,नांदेड जिल्हाधिकारी कार्यलय मध्ये केवळ अशोक चव्हाण पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून जिल्ह्यात इतर कुठेही उपविभागीय कार्यलय किंवा तहसील व इतर ठिकाणी ध्वजारोहण करू नये असा आदेश काढला आहे.

दि.15 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य प्रशासन परिपत्रक नुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यन्त साधे पणाने आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभ निमित्त 1 मे 2020 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यलय येथे ध्वजारोहण सकाळी 8:00 वाजता अशोक चव्हाण पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते होणार असल्याचे परिपत्रक काढले आहे.ह्या ध्वजारोहण मध्ये पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हापरिषद,यांनी उपस्थित राहावे असे नमूद केले आहे.

तसेच उपविभागीय अधिकारी यांचे कार्यलय,तहसील कार्यलय येथे ध्वजारोहण आयोजित करण्यात येऊ नये व तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुद्धा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास इतर अधिकारी ,कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये . सदरील परिपत्रक पाहता महाराष्ट्र मध्ये असे पहिलांदा कोरोना सारख्या महामारीला आळा टाकण्यासाठी हे पाऊल महाराष्ट्र प्रशासन यांनी उचलले आहे त्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी त्यांचे पालन करण्यासाठी परिपत्रक तयार केले आहे.सदरील परिपत्रक हे सर्व उपविभागीय अधिकारी मार्फत तहसील कार्यलय येथे दिले आहे.