Coronavirus Impact : इमारत सील बंद ! डॉक्टरकडे जावू न दिल्यानं वृध्दाचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुंबईतील कुर्ला भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता. यावेळी परिसरात उपचारासाठी बाहेर न जावू दिल्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विनायक संभाजी गायकवाड असे उपचाराअभावी ठार झालेल्याचे नाव आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः मुंबईतील कुर्ला भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे परिसर सील करण्यात होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता. ज्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. दरम्यान, विनायक गायकवाड यांची सोमवारी रात्री तब्बेत बिघडली होती. मात्र, पोलिसांनी बिल्डिंग सील केल्यामुळे डॉक्टराकडे जावू दिले नाही, असा आरोप कुटूंबियांनी केला आहे. परिणामी त्यांची तब्बेत जास्त खालावली. आज सकाळी गायकवाड यांचे राहत्या घरात निधन झाले आहे. गायकवाड ज्या इमारतीमध्ये राहतात, त्याच इमारतीत एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे इमारत सील करण्यात आली होती.

You might also like