Coronavirus : राजधानी दिल्लीत ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 990 नवे पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 21 हजाराच्या टप्प्यात

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा कहर जारी आहे. राजधानीत कोरोना रूग्णांची संख्या वाढून 20834 झाली आहे. मागील 24 तासात 990 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे आता कोरोनाने मरणार्‍यांची संख्या 523 झाली आहे.

दिल्ली सरकारकडून जारी आकड्यांनुसार, मागील 24 तासात 268 रूग्ण ठिक झाले आहेत. अशाप्रकारे डिस्चार्ज किंवा मायग्रेट करणार्‍या रूग्णांची संख्या 8746 झाली आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 11565 आहेत.

कोरोना व्हायरस महामारीचे वाढते संकट पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीच्या सीमा बंद केल्या आहेत. या निर्णयांतर्गत दिल्लीजवळच्या बॉर्डरला सील ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान ज्यांच्याकडे पास असेल आणि अत्यावश्यक काम असेल तर प्रवेश मिळेल.

बॉर्डर खुली करण्याबाबत सूचना मागवल्या

केजरीवाल यांनी दिल्लीच्या नागरिकांकडून बॉर्डर खुल्या करण्याबाबत सूचना मागवल्या आहेत. त्यांनी म्हटले की, दिल्लीत येथील नागरिकांच्या हिशेबाने योग्य तेवढ्या बेडची व्यवस्था आहे. परंतु, दुसर्‍या राज्यातून रूग्ण आले तर अडचण होऊ शकते. अशा स्थितीत काय करावे? सीमा सील केली पाहिजे की सर्व राज्यांसाठी खुली केली पाहिजे?

केजरीवाल यांनी म्हटले की, दिल्ली दिलवालों की है, यासाठी ते लोकांचे मत जाणून घेत आहेत. सीएम केजरीवाल यांनी सध्या एक आठवड्यासाठी दिल्लीची सीमा सील ठेवण्यास सांगितले आहे. पुढील आदेश लोकांच्या सूचना आल्यानंतर येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like