काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्येही कपलने केली 42 किमी ‘मॅरेथॉन’ पुर्ण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसमुळे सार्‍या जगात हाहाकार माजला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडता येत नाही. असे असतानाही एका कपलने आपला फिटनेस राखण्यासाठी एक अजब जुगाड केला. त्यांनी चक्क 42 किमीचे अंतर धावून पूर्ण केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, लॉकडाऊनमध्ये हे घराबाहेर पडले कसे ? पण हे कपलने घराबाहेर न पडता 42 किमी अंतर पूर्ण केले आहे. आपल्या 20 मीटरच्या बाल्कनीत त्यांनी ही मॅरेथॉन पुर्ण केली आहे.

दुबईमध्ये राहणार्‍या 41 वर्षीय कोलिन अ‍ॅलनने आपली पत्नी हिल्डासोबत 20 मीटरच्या बाल्कनीमध्ये 42.2 किमी मॅरोथॉन पूर्ण करण्याची कामगिरी केली. त्यांनी आपल्या बाल्कनीला चक्क 2100 फेर्‍या मारल्या. त्यांच्या या फिटनेस फंड्याचे जगभरातून कौतुक केले जात आहे. यात त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. एवढेच नाही तर, या कपलने आपल्या या मॅरेथॉन स्पर्धेचे ऑनलाईन प्रक्षेपणही केले होते. 42.2 किमी अंतर या कपलने 5 तास, 9 मिनिटे आणि 39 सेकंदात पूर्ण केले. कोलिनने इन्स्टाग्रावर पत्नीसोबत फोटो टाकत, आम्ही करून दाखविले अशी कॅप्शन दिली आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like