Lockdown : लॉकडाऊनच्या दरम्यान सारा अली खान आनंदानं करतेय ‘हुला-हूप’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकार सेल्फ आइसोलेशन मध्ये आहेत. अभिनेत्री सारा अली खानने एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती मजेदार शारीरिक व्यायाम करण्यात व्यस्त आहे आणि हुला-हूप करताना दिसत आहे. 24-वर्षीय या अभिनेत्रीने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की ती सूर्य आणि आकाशाला मिस करत आहे आणि ‘हुला-हूप’ करण्याचा प्रयत्न करीत आहे.

पोस्टमध्ये सारा हुला-हुप एन्जॉय करत आपली टोन्ड बॉडी दाखवताना दिसत आहे. या प्रसंगी तिने निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि व्हाईट क्रॉप योग टॉप परिधान केला आहे. ‘लव्ह आज कल’ अभिनेत्रीने पोस्ट बरोबरच एक काव्यात्मक कॅप्शन वापरुन आपल्या ‘हुला-हूप’ प्रेमाला दर्शवले.

त्यात लिहिले आहे, ‘माहित नाही मी का सूर्य आणि आकाशाला मिस करत आहे. हुला-हूप एक प्रयत्न आहे. बस जितके जमेल तितकेच प्रयत्न करायचे आहेत. पण आता घरी रहा – हे प्रत्येकाचे मत आहे. #stayhome astaysafe।’ यापूर्वी साराने देशातील कोरोना विषाणूचे संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान-केअर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री राहत निधीला मदत देण्याचे आश्वासन देखील दिले होते. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर याची घोषणा केली आणि लिहिले की, ‘चांगली कामे करण्याची हीच वेळ आहे. गरजू लोकांना मदत करा. आपले योगदान संरक्षण करेल आणि लोकांचे पोट भरेल. मी तुम्हाला समर्थनाची विनंती करते.

तिच्या हँडलवर पोस्ट केलेल्या आपल्या निवेदनात साराने असेही लिहिले आहे की, ‘या साथीच्या विरोधात होणारा प्रत्येक हातभार आणि एकता ही आपली एकमेव आशा आहे.’ अक्षय कुमार, शाहरुख खान, वरुण धवन, करीना कपूर, सैफ अली खान आणि करिश्मा कपूर यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनीही कोरोनो विषाणूच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी देणगी देण्याचे वचन दिले आहे. सारा अली खानचा मागील चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर होता आणि चित्रपटाचे नाव लव्ह आज कल असे होते.

You might also like