‘लॉकडाऊन’मध्ये एंटरटेंमेंट इंडस्ट्री ‘बेहाल’, CM ठाकरेंकडे पत्राद्वारे केली ‘ही’ खास मागणी !

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद आहे. असं असलं तरी स्टार्स चाहत्यांच्या मनोरंजनासाठी काही ना काही करताना दिसत आहेत. प्रत्येक क्षेत्रालाच लॉकडाऊनचा झटका बसला आहे. सध्या एंटरटेंमेंट इडंस्ट्रीत मंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दीर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इंडस्ट्रीनं खास मागणी करण्यात आली आहे.

फेडरनेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं (FWICE) सीएम ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे आणि आपली अडचण सांगितली आहे. त्यांनी मागणी केली आहे की ठाकरेंनी किमान पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला अनुमती द्यावी. पत्रात लिहलं आहे की, जर पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला परवानगी मिळाली तर कमी लोकांच्या मदतीनं आम्ही स्टुडिओतच काम पूर्ण करू. असं केलं तर लॉकडाऊन नंतर लगेच सिनेमा रिलीज करता येईल.

फेडरनेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अ‍ॅडवायजर अशोक पंडित यांनी ट्विट करत पत्राविषयी माहिती दिली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, सीएम ठाकरे पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला परवानगी देतील. त्यांचं म्हणणं आहे की, अशा टेक्निशियनलाही काम मिळेल जे लॉकडाऊनमुळं अडचणीत आहेत.

कोरोनाचा महाराष्ट्रात सर्वाधिक प्रभाव

महाराष्ट्रात कोरोनाची अनेक प्रकरणं समोर येताना दिसत आहेत. आकड्यांनुसार पाहिलं तर महाराष्ट्रात बाधितांची संख्या खूप आहे. त्यामुळं FWICEच्या प्रस्तावाला सीएम ठाकरे परवानगी देतात किंवा नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.